1. कपडे हँगर्स ला अडकवून ठेव.
    कपडे अडकवणीला/खुंटीला अडकवून ठेव.

  1. सर्वांनी गेटजवळ जमावे.
    सर्वांनी फाटकाजवळ/ प्रवेशद्वाराजवळ जमावे.
  2. हॉल मध्ये बाकीच्या सुचना देण्यात येतील.
    दिवाणखान्यात बाकीच्या सूचना देण्यात येतील.
  3. त्याने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे.
    त्याने स्वतःची समस्या स्वतःच  सोडवली पाहिजे
  4. आपण थियेटर्स वर भेटू.
    आपण चित्रपटगृह/ नाट्यगृहाच्या आवारात भेटू.
  5. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक.
    तुला माझ्याकडून शुभेच्छा.
  6. टॉयलेट कोठे आहे?
    प्रसाधनगृह कोठे आहे. ?(एकदम चारचौघात प्रश्न विचारायचा असेल तर)
  7. समर कोर्सच्या जाहिराती येण्यास सुरवात होईलच.
    उन्हाळी शिबीराच्या/ वर्गांच्या जाहिराती येण्यास सुरवात होईलच.
  8. वेफर्स घेऊन या.
    तळलेले काप घेऊन या.
  9. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. ( कौन बनेंगा करोडपती मधील वाक्य.)
    जो सर्वांच्या आधी  कळ दाबेल/इशारा करेल त्याला पहिली संधी मिळेल.