आनंद्घन,

प्रियाली ताईंचे सगळे मुद्दे वाचले असतीलच, कुशाग्रने देखील विसंगत वर्तन पुराव्याने दाखिवले आहे. तुम्ही त्या काळाचे उदाहरण देत आहात तर पहा,

१९८७-८८ मधे मी अवघा ७ वर्षांचा होतो आणि तेव्हा माझी आई अंथरूणाला खिळाली होती, माझ्या वडिलांनी सगळे घर अगदी १० दिवस व्यवस्थित संभाळाले होते अगदी प्रमोद सारखेच, माझी आजी येई पर्यंत. माझ आई आज पण ते दिवस आठवून सर्वा समक्ष माझ्या वडिलांना श्रेय देते (लग्न १९७९ साली झाले), तुम्ही  अजून लिहिता की पात्रे त्या वेळी मध्यमवर्गीय व छोट्या शहरातून/गावातून आलेलि आहेत व त्यामुळे त्यांची विचारसरणी तशी आहे, चूक...एकदम चूक. माझी आई पुण्यातून श्रीमंत कुटूंबातून, बंगल्यातून  मुंबईत दोन खोलींच्या घरात १९७९ साली आली. तेव्हा तुमचा विचारसरणीचा मुद्दा देखील साफ चूक आहे. मोठे मन, प्रतिकूल परिस्थितीला खंबीर  पणे तोंड देणे हे काही स्त्री स्वभाव आहेत. माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत व त्या बरोबरच स्त्रीचा आदर करण्यास शिकवले आहे. जर ही कथा मी लिहिली असती तर प्रियाली ताईं सारखेच पण जरा जास्त कठोर ताशेरे माझ्या आईनेच ओढले असते.

एकूणच तुमची ही कथा लिहितानाची विचारसरणी चूक आहे! जर ही सत्यकथा असेल तर कींव वाटते मला त्या लोकांची.