बहुतेक आणि आजुबाजुचे आपल्याला दिसत नसल्याने आपण स्वतःला(जे कधीही दुसऱ्याने म्हटलेले चांगले) उदारमतवादी म्हणवत आहात. तुम्ही असे कोणते मुद्दे मांडले की मी उत्तरे  देऊ. त्यामुळे आपल्याशी वाद न घालणे कधीही चांगले. आपण काहीतरी प्रतिसाद  लिहीलात त्या बद्दल आपले मनपुर्वक आभार.

या शपथ पत्राचे महत्त्व आपल्या लक्षात आले नाही त्याबद्दल वाईट वाटले. या परप्रांतियांना मुंबईत थारा देणारा कोण तर मराठी माणुस आणि त्याची सहिष्णू वृत्ती. संकट काळी परप्रांतीयांनी आपल्या मदतीस येणे मान्य. असे असले तरी त्यांची महाराष्ट्रातली सतत वाढत जाणारी संख्या आपणास बरोबर वाटते का? आणि एखादा परप्रांतिय आपल्या जागी असता तर निश्चितच मराठी माणुस त्याला वाचवायला गेला असता. भाषेची अस्मिता जपणे  आणि संकटकाळी धावुन जाणे यात फरक आहे. आणि परप्रांतियांनी मुंबईत यावे असे आपण म्हणता पण ते तर फक्त पैसा कमावण्यासाठी मुंबईत येतात त्यांना मुंबईशी, इथल्या संस्कृतीशी ,आमच्या मराठी भाषेशी काहीही देणघेण नाही . वाटल्यास पहा आजूबाजूला.त्यांना दिसतो फक्त पैसा. मुंबईत मराठी माणुस आज हळूहळू कमी कमी होत चाललाय. बॉलीवूडचे उदाहरण देताय पण या हिरोलोकांना डोक्यावर घेऊन नाचणारा कोण तर मराठी माणुस.परप्रांतियांची आजघडीला निरनिराळ्या उधोगधंतात लॉबी असल्याकारणाने ते सजाससहजी कोणाला वरती येऊ देत नाहीत. आता तुम्हाला इडली,डोसा ,पाणिपुरी आणि बरेच काही पदार्थ भयानक आवडतात. त्याची तुम्ही सवय का करुन घेतली. यांत चुक कोणाची  तुमची की मराठी माणसाची. पहा जरा विचार करुन.

काही चुकीचे लिहीलेले वाटल्यास मला माफ करा आणि आपण उदारमतवादी असल्याने तसे कराल असे वाटते. माझ्यापुरता हा विषय संपलेला आहे.

जय महाराष्ट्र !

आपला कॉ.विकि

(प्रशासकांची पुस्ती: व्यक्तिगत उल्लेख वाटलेला मजकूर काढलेला आहे. असे उल्लेख होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.)