तुम्हाला नाही पटत तर नाही पटत. एका मराठी माणसाचे मत दुसऱ्याला पटले पाहिजे असा काही कायदा नाही ना?
इथे आपल्याला परप्रांतियांबद्दल अतिप्रेम वाटत असेल तर तो आपल्या नजरेचा दोष समजा. मुंबईची स्थिती परप्रांतियच का हो, नागपूर-पुणे-सांगली-औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील इतर खेड्यापाड्यांतून येणाऱ्या लोकांना सामावून घेणारीसुद्धा नाही. हे आपल्या डोक्यात येते का? जर कायदा लावायचाच झाला तर तो मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसाला लावावा लागेल. जर मुंबईत घाण होते तर जबाबदार घाण करणाऱ्या लोकांसोबत यंत्रणाही नाही का?
शिवसेनेचे राज्य येऊन गेले. ४० वर्षांपूर्वी काढलेल्या फतव्यातील किती गोष्टी खऱ्या झाल्या? किती त्यांनी स्वतःहून बदलल्या.
विकिपंत,
जिथे शिवसेनाच हा फतवा विसरली आहे किंवा दुर्लक्षित करून बसलेली आहे तिथे तुम्ही दुसऱ्यांना का प्रश्न विचारता? मातोश्री नाहीतर शिवसेना भवनालाच घेराव घाला की.
असो.. या विषयावर जे काय बोलायचे ते या चौकटीत बोलायला आपण मोकळे आहात कारण सरकारच्या लेखी आणि शिवसेनेच्या अंतरंगी याला काहीही मूल्य नाही हे आपल्याला कळते का?
फतवे काय हो कोणीही काढू शकते. मराठी माणसा तू लढ, प्रसंगी जीव दे! मी मात्र करोडो रुपयांच्या जमिनी विकत घेतो आणि लाखभर रुपयांचे मासे पाळतो. याख्रेरीज शिवसेना सध्या काय करत आहे ते ही सांगा.