माझे बाबाही अशी मदत करतात वगैरे माहित असूनही मी अचानक सकाळी सकाळी टपकले तर कणकेच्या हातवाल्या काकांना कुठे लपवू नि कुठे नको असे काकूंना होत असे. "आमच्या ह्यांना चहासुद्धा करता येत नाही", हे काकूवर्गाचे अभिमानाने सांगायचे वाक्य असे.
मला वाटते स्वयंपाकघरात 'लुडबुड' आणि आजारी पत्नीसाठी संपूर्ण घर चालवणे यात आपण गफलत करत आहात. लुडबुड अनेक स्त्रियांना आवडत नाही किंवा त्याचे जाहिर प्रदर्शन आवडत नाही कारण यात अहंकार सोडा पण बाकीचे लोक 'या बाईला साधा स्वतःहून स्वयंपाक करता येत नाही की काय? तिथेही नवरा लागतो?' असा प्रश्न विचारतील याची भीतीही असावी.
परंतु जी स्त्री अंथरुणाला खिळून आहे आणि त्यामुळे नवरा स्वयंपाक, घर, मुले सांभाळतो त्याचे समाज कौतुकच करेल किंबहुना केलेलेच पाहिले आहे. वरील ज्याला आपण अतिशयोक्ती विनोद म्हणत आहात तो सोडलात तरी सामान्य मध्यमवर्गियांच्या लक्षात येईल की येणाऱ्या मैत्रिणी बरेचदा पदर खोचून कामाला लागतात. सदर गोष्टीत येणाऱ्या कोणत्याही स्त्रीचे वर्णन सकारात्मक नाही.
तो आधी काही काम करत होता का, वगैरे प्रश्न गौण आहेत. कुटुंबासाठीची कोणती कामे कोणी करावीत हे ठरवणे हा ज्या त्या कुटुंबाचा प्रश्न आहे.
अगदी, माझाही हा हेतू नाही. प्रश्न यासाठी आला की जेव्हा सुरेख चौकोनी कुटुंब असते तेव्हा त्यात नवरा बायको आजारी असले तरी एकमेकांच्या सल्ल्याने वागतात. संपूर्ण कथेत प्रमोदसाठी ३ परिच्छेद खर्च केल्यावर प्रमिलाला एकही ओळ बहाल केलेली नसणे मला विचित्र वाटते आणि म्हणूनच गोष्टीला एकांगी म्हटले.
प्रमोदचे कौतुक न करणे असा हेतू अजीबात नव्हता.