'एखादी मराठी व्यक्ति, स्वयंतेजाने, स्वतःच्या अंगभूत गुणांमुळे देशांत, व देशाबाहेर, झळकू लागली, की तिला कमी लेखण्याचे प्रयत्न करू नयेत' हे मराठी माणसाला अंगिकारणे महा कठीण आहे, ह्याची बाळासाहेबांना प्रथमपासूनच जाणीव असल्याने त्यांनी हा मुद्दा वगळला असावा. तेव्हा 'लताबाई, भारतरत्न पुरस्कार परत करा', 'सचिनने आता संघभावानेचा विचार करून संघातून बाहीर पडावे...' वगैरे सर्व बिंधास्त चालू राहूंदे. आणि हो, आता गावस्करांनापण महाराष्ट्रभूषण किताब मिळाल्याने तात्काळ त्यांनाही केव्हा काय 'ठामपणे' सुनावता येईल, त्याचा समस्त मराठी बांधवांनी कृपया गंभीरपणे विचार करावा.