दूरचित्रवाणीसंच अधिक अचूक हे मान्य. मात्र शब्द जर सुटसुटीत असेल तर पटकन वापरला जाउ शकतो म्हणून दूरसंच. जर रिमोट कमांडर वा रिमोट कंट्रोल ऐवजी नुसता रिमोट हा शब्द चालतो तर दूरसंचही चालायला हरकत नाही. नुसत्या रिमोट या शब्दाचा अर्थ पार वेगळा आहे! सेलफोन ऐवजी सेल प्रचलित आहेच. शिवाय ससंदर्भ अर्थ लक्षात घेतला तर सहज समजते की दुरध्वनीसंच असे न म्हणता दूरध्वनी घणघणला असे म्हणतात, दुरध्वनीसंच वाजतोय असे म्हणत नाहीत. त्याचप्रमाणे दुरदर्शिका/ दुर्बिण कुणी दिवाणखान्यात मोठ्या शोभिवंत प्रदर्शिकेत मांडुन ठेवीत नाहीत.  टेलिग्राफ ही सामान्यतः घरच्या वापरातली वस्तु नाही आणि आता तर ती कालबाह्य होउ घातली आहे.

तेव्हा दुरसंच म्हणताच मांडणीच्या संदर्भात दुरदर्शन संच हे साहजिक अभिप्रेत आहे.