"आपण" विरामचिन्हे इंग्रजीतून घेतली नाहीत.  तर मेजर टॉमस  कॅन्डी(जन्म: १३ डिसेंबर १८०४,इंग्लंड; मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७, महाबळेश्बर) या ईस्ट इंडिया कंपनीत लष्करी अधिकारी असलेल्या मराठी पंडिताने तत्कालीन विद्वानांच्या विरोधाला न जुमानता ती सरकारी आदेश आणवून मराठी लिखाणात घुसडली. त्या काळची मराठी अत्यंत भोंगळ होती. मराठी वाक्यरचनेतील शैथिल्य व अनियमितपणा काढून टाकून भाषेला बंदिस्तपणा आणण्याचे महान कार्य कॅन्डी याने केले. मोल्सवर्थ या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विनंतीवरून कॅंडी यांनी मराठी-इंग्रजी शब्दकोश तयार केला(१८३२).  कोशाची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये प्रसिद्ध झाली. हा कोश सर्वत्र मिळतो.  आजही त्याच्यासारखा उत्तम कोश नाही.