तमी दाटलेल्या ध्रुवासारखी मी
तुझा चेहरा पाहते चालते
कधी मोगऱ्याची फुले आठवोनी
मनाला तुझे चांदणे माळते ....
ह्या ओळी विशेष आवडल्या. त्यातही शेवटच्या दोन ओळी. कविता छान आहे. अनंताचे कडवेही चांगले.
हसावे तरी ऊर दाटून येतो
रुसावे तरी एकटीने कसे?
ह्या दोन ओळीही चांगल्या आहेत. 'अनामी' तिथे कशाला वावरतो आहे? त्याचे तिथे प्रयोजन काय? पादपूर्तीचे आहे काय?