हि कवी कल्पना वाटते. जाहीरनामा नाही.

  1. भारता हा बुरख्याआडचा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे सर्व राज-कारण धर्म आणि पैसा या बळावर चालते. अलिकडे राजकारणात लोक येतात तेचमुळी आधी धर्म आणि मग जात याचा वापर करून आणि करण्यासाठी.
  2. जगातले सर्वच देश आपला धर्म कोणता हे सांगतात. याला अपवाद भारत आणि आता नेपाळ. माझे वैयक्तिक मत असे आहे कि धर्माला एक वैचारीक आणि सामाजिक बैठक असते. जेव्हा देशावर धर्माचा ताबा येतो त्यावेळी नके प्रश्न निकालात निघतात. भारतात तसे होणे नाही. धर्मनिरपेक्षेतेचा वापर करणारे मुळातच त्याचा पुरेपुर फायदा घेतात.
  3. भारताचे प्रश्न प्रत्येक भारतीयाला माहीत आहेत कारण ते प्रत्येकाचे आहेत. तरिपण आपण यावर काहिच करत नाही. राजकारणा वद्दलची प्रत्येक नागरिकाची उदासीनता हे एक मोठे कारण आहे. कदाचित एका कुटूंबचा राजकारणा वरचा प्रभाव हे ही एक कारण असेल.

लिहिण्या सारखे मुद्दे खुप आहेत पण हा प्रचंड चघळलेला विषय आहे. त्यातुन विधायक काहि होण्या पेशा  वाद जास्त होतात हा अनुभव आहे.

आपले पहिले दोन मुद्दे परस्पर विरोधी आहेत. पहिल्या मुद्यावर दुसरा मुद्दा न समजावणे हा एक प्रभावी उपाय आहे. पण तेथे मानवतावादी आडवे येतात.

मनसे हा पुण्याच्या उदाहरणा वरून फसवणुकीचा प्रकार वाटु लागला आहे. एवढेच होते ते तर निवडणुकी आधी संधी करायची. शिवसेनेच्या विरोधा करिता कशाला? याला नक्की काय म्हणायचे? काँग्रेस मध्ये विलिनीकरण केले तर निदान मुख्यमंत्री पद गळ्यात पडेल. कॉग्रेसला नक्किच जनाधार आहे. अजुनही काँग्रेस सत्तेवर आहे, याचे उत्तर शोधणे जास्त योग्य नाही काय?

मला वाटत एखादा पक्ष निवडुन येईल जेंव्हा...

  1. तो प्रत्येक समाजातल्या उणिवाची जाणीव करून देईल आणि प्रत्येकाला हातात हात घालायला शिकवेल.
  2. तो भारतातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या धर्माला सुधारून इतर धर्मांना त्या धर्माला मान द्यायला शिकवेल.
  3. तो प्रत्येकाला हे शिकवेल कि एखाद्या धर्माचा पुरस्कार करणे म्हणजे धर्मांधता नव्हे.
  4. जाहिरनामा करण्या ऐवजी, सामान्य माणसाला त्याच्याकडे असलेली शक्ती दाखवून स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आणि स्वतःला लायक आहे इतक्याचीच अपेक्षा ठेवायला शिकवले आणि अपेक्षा वाढवण्यासाठी कुवत वाढवायला शिकवेल.
  5. तो प्रत्येकाला दाखवून देईल कि जग कुठे आहे आणि आपण कुठे आहोत? जर तो पल्ला गाठायचा असेल तर मतभेद विसरून एकत्र यायला हव अन जगात भारतीयाला सन्मानान वागणूक मिळण्याइतपत प्रत्येक भारतीयामध्ये आत्मविश्वास जागा करावा. हे शिकवेल.

मग जाहीरनाम्याची गरज उरणार नाही.

काही प्रश्न..

  1. भारतात इतके राजकिय पक्ष का?
  2. भारताची लोकसंख्या प्रमाणात न राहण्याचे खरे कारण काय?
  3. मनसेची स्थापना न करता राज ठाकरेंना समाज जागृतीचे पवित्र काम करता आले नसते का? त्यासाठी मनसे स्थापणे हा एकमेव उपाय होता का?
  4. मनसेच्या ध्वजामध्ये धर्मांचे आणि जातीचे ठळक रंग का?

विषय चांगला आहे, लिहिण्यासारखे खुप आहे पण त्यातुन वाद जास्त आहेत.