वासोट्याची अनेक चित्रे गूगलमधून शोधल्यास मिळतील.
उदा: http://www.imagestation.com/album/pictures.html?id=2117262199

वासोट्यावरुन नागेश्वरला जाण्यासाठी दोन प्रचलित वाटा आहेत.
वासोटा किल्ला दोन तृतीयांश चढल्यानंतर उजवीकडे वळा... घनदाट जंगलातून नागेश्वराकडे जाता येते.

दुसरी वाट थोडीशी विचित्र आहे. जीएस यांनी उल्लेख केलेल्या मारुतीच्या मंदिराजवळ आल्यानंतर उजव्या दिशेने ओढ्यातून (ओढा संपेपर्यंत) सरळ चालत जावे.नागेश्वराचा सुळका थोड्या वेळाने दिसू लागतो.
ओढ्याच्या आसपास प्राण्यांच्या पावलांचे वगैरे ठसे, सापाची कात... क्वचित साप दिसतो.

अनेक ठिकाणी दगडांवर दिशादर्शक बाण आहेत.

दोन्ही वाटांवरचा प्रवास अतिशय वेगळा अनुभव आहे.

वासोटा व नागेश्वर ही दोन्ही ठिकाणे पाहण्यासाठी शक्यतो वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करावा.