हॅम्लेटजी,
मला वाटतं सध्याही या गोष्टी (निदान यातल्या काही) होतायत; पण त्याला आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे चर्च,गुरुद्वारा (मंदिर, मस्जिद) इ. मुद्द्यांचं ग्रहण लागतंय.
उदा.
१) सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण साक्षर करायचा कार्यक्रम राबवलेला (आणि माझ्या माहितीप्रमाणे यशस्वी झालेला) मी स्वतः पाहिलाय.
२) एडस बद्दल जनजागृती करण्यात येत आहे. अनेक जाहिराती रोज दूरसंचावर / आकाशवाणीवर येतात. अनेक दवाखान्यांतही ही माहितीउपलब्ध आहे. दूरध्वनी क्र. उपलब्ध आहे, जिथे फुकट शंकानिरसन होऊ शकतं इ. या सगळ्या गोष्टी (निदान दूरसंच / आकाशवाणी)वेश्यावस्तीतही वापरल्या जात असाव्यात.
३) क्र.२ चा मुद्दा संततीनियमनासाठीही लागू होतो.

आपले मुद्दे मला कमी लेखायचे नाहीयेत; ते महत्त्वाचेच आहेत आणि त्यांच्यावर विचार व्हायलाच हवा; पण त्याबरोबरच आपण स्वतःलाही काही प्रश्न विचारावेत आणि निदान स्वतःपासून सुरुवात करावी -
१) किती व्यावसायिक सगळं उत्पन्न दाखवून पूर्ण कर भरतात?
२) प्रदूषण - आपण यात रोज किती भर घालतो तेही पाहावं. आपण रस्त्यात थुंकतो, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतो, सिगारेट /बिस्किटं / चटपटीत खाद्य इ. रस्त्यात टाकतो, गाडीचं प्रदूषण-उत्सारण वेळीच तपासून घेतो का, गाड्यांचे कर्णे जोरात आपणच फुंकतो ना(ध्वनी प्रदूषण), इ.?
३) आपल्याला नियम मोडायला फार आवडतं.. उदा. वाहतूक यंत्रणेचं (हवालदार नसला तर) पालन न करणं, इ.
- कुमार