स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल आभार. हा लेख काहीजणांना रट्टाळ वाटण्याची शक्यता आहे.(हा लेख लिहीताना मी इतकी वैतागले होते की माझा चेहरा पाहून कोणी माझ्याशी बोलायचं धाडसही करत नव्हतं!! बहुधा तो कंटाळा लेखातही उतरला असावा.)
विशेष सूचना: या लेखात 'टेस्टर' बद्दल लिहीलेली वाक्ये निव्वळ विनोदनिर्मीतीसाठी लिहीली आहेत. शिव आणि शक्ती हे जसे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत तसेच टेस्टरशिवाय डेव्हलपर आणि उलटे अपूर्ण आहे हे आम्ही जाणतो आणि त्यांचा आदर करतो.