स्वत:चे लिखाण शक्यतो मनोगताच्या व तेथील घटना/व्यक्तींच्या संदर्भाशिवाय प्रकाशित करण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरुन माझ्या अनुदिनीवर किंवा इतरत्र ते नंतर प्रकाशित केल्यास ते वाचक 'मनोगत म्हणजे काय?' म्हणून गोंधळून जाऊ नयेत. (शिवाय "मनोगताच्या मुख्य आवारात कोणाही त्रयस्थ व्यक्तीला सार्वजनिकरीत्या व्यक्तिनिरपेक्षरीत्या विनासायास आस्वाद घेता येईल असे लेखन होणे अपेक्षित आहे. " या सार्वजनिक सुचवणीचा अंमल करण्यासाठीही हा प्रयत्न आहे.) इ सकाळ, विकीपीडीया हे माहितीस्त्रोत मनोगतावर लिखाण वाचन न करणाऱ्यानाही माहिती असावेत. म्हणून फक्त त्यांचाच उल्लेख केला.