चित्त, तुम्हाला दोन्ही हाती ट्रेक जमू लागले की नक्की या आमच्याबरोबर.
छू, माहितीबद्दल धन्यवाद. मागे नागेश्वरास गेलो होतो तेंव्हा ओढ्यातून वर गेलो आणि वासोट्याच्या वाटेने उतरलो होतो.
केशवा तुझी सगळ्यांनीच आठवण काढली.
अत्यानंद, आपली काळजी स्वाभाविक आहे. त्यात याच रविवारी सिंहगडावर एका कसलेल्या ट्रेकरचा ( एंड्युरो विजेत्या) कल्याण दरवाजापाशी पडुन तर अजून एका परिचित ट्रेकरचा हरिश्चंद्रगडावर असे दोन मृत्यू ओढवले. पण तरीही असे सांगावेसे वाटते की साधारण सर्वच ट्रेकमध्ये कुठलेही विशेष कौशल्य लागत नाही. फक्त काही काही जागा अशा असतात की फार अवघड नसतात पण चुकीला क्षमा नसते. त्यामुळे कायमच पुरेशी काळजी घेत वावरणे एवढेच करायचे असते.