प्रतिसादाबद्दल सर्वांचे अनेक धन्यवाद.
निनाद२९
हा मजकूर कुठेही दिला तरी चालेल.
प्रियाली
बहुधा नाही. पण या जाहीरनाम्यावर निदान निवडून तरी येईल की नाही ते ही सांगणे कठीण आहे.
चाणक्य
आपल्या म्हणण्यात तथ्य आहे. हा जाहीरनामा 'आयडीयल' आहे. क्रमांक १ चा मुद्दा पटला. आपल्यासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्मावरून दंगली व्हाव्यात ही गोष्ट हेच दर्शवते. कोणते मुद्दे परस्परविरोधी आहेत ते कळाले नाही. आपल्या प्रश्नांपैकी क्रमांक १, ३ आणि ४ चे उत्तर खुर्ची असे आहे. क्रमांक २ चे उत्तर गुंतागुंतीचे आहे. यात साक्षरता, लोकजागरण असे अनेक मुद्दे येतात.
कुमारजी
काही होत नाही असे मला अजिबात म्हणायचे नाही. आणि आपण दिलेल्या उदाहरणांवरुन हे नक्कीच स्पष्ट होते. प्रदूषण, सार्वजनिक स्वच्छतेसारख्या गोष्टींमध्ये लोकांचाही वाटा आहे हे ही पटले. खरेतर इवल्याश्या सिंगापूरमध्ये जे जमू शकते, ते आपल्या देशातही व्हायला हरकत नसावी. स्वच्छतेविषयी सध्या आपल्याकडे केवळ कागदावरच कायदे आहेत, ते प्रत्यक्षात आले तर अजून चांगले होईल. (अर्थात इथे परत भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो.)
माधव
आपण दिलेली विस्तृत उदाहरणे निश्चितच वाखाणण्याजोगी आहेत. वर म्हटल्याप्रमाणे या दिशेने काहीतरी हालचाल होते आहे हेच यावरून दिसून येते. सौर उर्जेच्या बाबतीत अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. आपल्या देशात कमीतकमी ८-१० महिने सूर्यप्रकाश उपलब्ध असतो, त्याचा उपयोग केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल. तसेच पवनशक्तीचाही उपयोग व्हायला हवा. महाराष्ट्रामध्ये विजेचा प्रश्न विशेष गंभीर आहे. शिक्षणविषयक धोरण नक्कीच बदलायला हवे. वर म्हटल्याप्रमाणे हे मुद्दे बर्याचे वेळा चर्चेला आले आहेत. आपल्या देशातील सर्व पक्षांचे एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे सत्ता. अर्थात हे फक्त भारतात नाही तर अमेरिकेतही आहे. आणि सत्तेवर येण्यासाठी ते काहीही करू शकतात. म्हणूनच त्यांना जात, धर्म इत्यादीचा आधार घ्यावा लागतो. अ पक्षाने ब पक्षाशी युती केली किंवा युती मोडली या सर्वांमागे हेच कारण असते. एकदा सत्तेवर आल्यावर क्रमांक ९ च्या आधाराने जास्तीत जास्त वैयक्तिक फायदा करून घेणे हा हेतू असतो. एक हजार कोटी रुपयांचा चारा घोटाळा हे हिमनगाचे टोक आहे, अजून उजेडात न आलेल्या भ्रष्टाचार किती असतील याची कल्पना केलेली बरी. लोकांच्या हितासाठी असलेल्या सर्व योजनांमध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधील मोठा भाग भ्रष्टाचाराच्या रुपाने गिळंकृत होतो.
मागे एका बातमीमध्ये पाच आय.आय.टी.मधून पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या पगाराच्या नोकर्या सोडून एक राजकीय पक्ष स्थापन केल्याची बातमी वाचली होती. त्यामुळे अजूनही आशेचा किरण आहे असे वाटते.
हॅम्लेट