या लेखावर आलेल्या चांगल्या, तसेच नापसंतीच्या प्रतिक्रियांबद्दलही आभार.
माझे सर्व लिखाण इतरांना सर्व वेळी आवडावे अशी माझी अपेक्षा मुळीच नाही.'नाकाखालीच' हा अनुवाद अजिबात न आवडल्याचेही मला काही व्यंइ. तून कळले आहे. (पण त्यातल्या त्यात लिहीलेल्या सर्व लिखाणापैकी बऱ्यापैकी परसेंटेज आवडावे अशी अपेक्षा(इच्छा) नक्कीच मनातून आहे. खोटा निरीच्छपणा आणि उदात्तपणा कशाला दाखवू?)
हा लेख ठळकपणे उणा का जाणवतो आहे याबद्दल विचार केल्यास मला काही पर्याय सुचतातः

१. परत परत तोच विषय घेतल्यामुळे येणारा तोचतोपणा.
२. लेखात जास्त झालेली अतिशयोक्ती
३. लेखिकेची स्टीरियोटाइप्ड झालेली लेखनशैली
४. नाही क्लिक झाला! कारण नेमके नाही सांगता येत!
५. लेखातील विषय अतितांत्रिक वाटल्याने वाचताना आलेला वैताग
६. कंसातली वाक्ये अति झाल्यामुळे वाचायला होणारा त्रास
७. एकूणच लेखिकेचे 'मी' विषयी लेख जास्त झाल्यामुळे आलेला रटाळपणा.

'चांगले' लिहीणे सोपे आहे, पण सतत चांगले लिहीणे कठीण असे दिसते. ते फार कमी लोकांना जमते.' मी आता लिहीणे बंद करते' इ.इ. मी म्हणणार नाही कारण लिहीणे हा माझा 'आऊटलेट' आहे, पण या किंवा इतर कोणत्या नावडत्या लेखात झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच राहिल.  
(यापैकी कोणते पर्याय ते मला व्य. नि. मधून कळवावे..)