या उपक्रमात मी सहभागी आहेच. परभाषिक शब्दांना पर्यायी प्रतिशब्द योजतांना
क्लिष्ट, बोजड शब्दांऐवजी साधे सोपे शब्द रूढ करणे अवघड नाही. आपण दैनंदीन व्यवहारातही
कटाक्षाने मऱाठी शद्व वापरण्याची संवय लाऊन घेतली तर ती या संकल्पाचा पाया अधिक दृढ होईल.
उदा. मिठाईच्या दुकानाला 'स्वीट्स'  म्हणण्याची काय गरज.  नाशिकच्या 'पांडे मिठाई' ला कोणी 'पांडे स्वीट्स' म्हणत नाही. मग 'सागर स्वीट्स' ला 'सागर मिठाई' म्हटले तर कुठें बिघडले. मराठी 'सा रे ग म प' ची निवेदिका पल्लवी जोशी
हिला 'परफॉर्म' करणे या ऐवजी सादर करणे असें एकदाही म्हणावेसे वाटले नाही.