अनु,

तुझा हा रंगतदार  लेख मी जरा उशीरा वाचला पण वाचून मला माझ्याही रांगिक समस्या सांगाव्याश्या वाटल्या. 

मला अगदी समजायला लागल्यापासून एका प्रश्नाने भेडसावले आहे. क ह्या कपड्याचा रंग  कच्चा असतो म्हणून तो ख ला लागतो पण ख ला लागल्यावर मात्र तोच रंग एकदम पक्का कसा काय होतो?  कुणीतरी त्याचं  उत्तर मला दिलं आहे. पण मला ते तितकंसं पटलं नाही. ते उत्तर असं : म्हणे रंग कच्चा वगैरे नसतो. अ जवळ जो अतिरिक्त (excess) रंग असतो, तो ब ला लागतो.   म्हणजे रंगांच्या बाबतीतही 'पोटेंशियल डिफरन्स' वगैरे असतं  असं त्यांना म्हणायचं होतं की काय कुणास ठाउक?!

गडद साडीसाठी तशाच गडद रंगाचा परकर आपण घेतो. त्याचा रंग जाणार हे जवळजवळ  पक्कं असतं (रंग कच्चा असला तरी, किंवा म्हणूनच!) त्यामुळे तो इतर कपड्यांच्या बरोबर धुलाईयंत्रात धुता येत नाही. एकाच कपड्यासाठी धुलाईयंत्र चालवणे हा उर्जेचा, पाण्याचा (आणि खरं म्हणजे आपल्या पैशाचा) अपव्यय आहे. म्हणून मी काय करते? परकराच्या रंगाच्या चादरी, टॉवेल वगैरे हेरून ठेवते.  हे कपडे पुरेसे मळेपर्यंत परकर तसाच 'अधूत' अवस्थेत ठेवते आणि मग हे समरंगी कपडे धुलाईयंत्रात एकत्र धुते. अर्थात मधल्या काळात इच्छा झाली तरी 'ती' साडी नेसता येत नाही. पण कुछ पानेके लिये कुछ खोना पडता है। इत्यादी, इत्यादी...

असो. लेख आवडला.

-मीराताई