विषय चांगलाच निवडला आहे. मी याच्या कडे वेगळ्या पद्धतीने पाहू इच्छितो. प्रत्येकामध्ये बरीच कौशल्ये विकसीत झाली पाहिजे. उदा. पांडवाचे उदाहरण घेता येईल. विराटाकडे विजनवासात असताना धर्मराज विदूषकाचे, भीम स्वंयपाक्याचे, अर्जुन नर्तकीचे आणि सहदेव घोड्याच्या खराऱ्याचे काम करत असत. ज्यांना आयुष्यात काही साध्य करायचे असेल त्याने बऱ्याच कला अवगत करून घेतल्या पाहिजे.