धरणाच्या गोष्टी, तिथल्या आंदोलनांविषयी नेहमीच वाचायला मिळते. पण ते म्हणजे बातमीसारखे. प्रत्यक्ष जिवंत अनुभव वाचून अंतर्मुख व्हायला होते. धरणांचा उपयोग शेतकऱ्याला, वीजनिर्मितीला किती आणि काळ्या पैशाची कुरणे वाढवायला किती असा प्रश्न पडतो. माणसे विस्थापित होतात त्यांच्या बातम्या होतात. प्राणी, झाडे जी नष्ट होतील या रेट्यात त्यांची तर नामोनिशाणीही राहणार नाही!
श्रावण, लेख चांगला झाला आहे. प्रश्नांची आवर्तने चांगली व्यक्त झाली आहेत. दिगंभांची म्हण एकदम चपखल!