वरील लेखनात आधी नेमकी परिस्थिती काय आहे याची थोडी ओळख करून द्यायला हवी होती.  अमेरिकेत एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यावर लगेचच सर्वांच्या ओळखी होतातच असे नाही, त्याला थोडा वेळ जायला लागतो. वरील आठवणीत आम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात सुनिता, येमुल व त्यांचा मुलगा प्रथमेश यांच्याकडे आम्ही पहिले काही दिवस राहिलो होतो. नंतर जागा मिळाल्यावर स्वत:च्या जागेत रहायला गेलो. माझी व सुनिताची मैत्री लगेच झाली, कारण आम्ही दोघीही पुण्याच्याच. क्लेमसन हे शहर खूपच सुंदर आहे. उंच सखल भागात विभागले आहे. नंतर आमच्या दोघींचे घर एकमेकींपासून खूपच लांब. दोघांच्याकडे कार नाहीत. तिचे घर उंच डोंगरावर तर माझे घर दुसऱ्या एका भागात कमी उंचीच्या डोंगरावर. दोघींचे नवरे सकाळी कामाला गेले की एकदम संध्याकाळी उशीराने येत. ती तिच्या घरी एकटी व मी माझ्या घरी एकटी पूर्ण दिवस खूपच कंटाळून जायचो.

अमेरिकेत पटकन कोणी बोलायला माणसे मिळणे तसे थोडे कठीणच असते. आम्हाला तर पहिल्यांदाच मराठी कुटुंब भेटलेले त्यामुळे जास्त आपुलकी. आमच्या आधी काही दिवस ते त्या शहरात थोडे स्थिरस्थावर झाले होते. इतर ओळखी व त्या शहराची माहिती होईपर्यंत आम्हीच एकमेकांना आधार. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस का होईना मला तिच्या घरी जाता यायचे. त्यामुळे आमच्या दोघींचा तो एक दिवस खूपच मस्त जायचा. बाकीचे दिवस आम्ही दिवसातून दोनदा फोनवरून एकेक तास बोलायचो. जीवनात काही वेळा काही काही गोष्टी कायमच्या आठवणीत रहातात त्यापैकी वरील एक आठवण.

संजोपराव व सुमीत, प्रतिसादाबद्दल आभार.

रोहिणी