धन्यवाद. थोडं घाबरतच हा लेख इथं टाकला होता. युनिकोडमध्ये हा लेख टंकीत करताना भयंकर त्रास झाला. साडेतीन तास लागले. एवढ्या वेळात एरवी मी याच्या तिप्पट मजकूर टंकीत करतो. पण त्या त्रासाचे तुमच्या अभिप्रायाने सार्थक झाले. धरण असो किंवा आणखी कोणताही विकास प्रकल्प, विनाश अटळ ठरवतच तो अंमलात आणावयाची `जिद्द' केली की काय होतं याचा त्या प्रवासात घेतलेला अनुभव इतका सच्चा होता की, लेखासाठी फार काही करावेच लागली नाही. तो उतरत गेला.

धरणाविषयी, कोणत्याही, दोन बाजू असतातच. कोणती बाजू घ्यायची हा ज्याच्या-त्याच्या धारणेचाच प्रश्न असतो. मला इतकेच सुचवावेसे वाटते की, त्या बाजू आपल्याच अभ्यासातून तयार व्हाव्यात आणि मगच बाजू घेतली जावी. जिथं असा अभ्यास आपल्याला शक्य नसतो तिथं बाजू न घेतली तर...? अर्थात, धोरण म्हणून केंव्हाही एक बाजू घेता येतेच म्हणा.

दिगम्भांची म्हण मलाही पटली.

`सेझ'मध्ये काय घडायचं आहे? नंदिग्राम...

प्राणी, पक्षी, झाडे (जंगल) म्हणाल तर, ते तिथं नाहीच असं म्हंटलं तर त्यांची मोजदाद तरी कशी करायची? घरांना झोपड्या म्हणण्याच्या त्या काळात तेही अनुभवलं होतंच. इथं तर माणसांच्याच मोजदादीचा प्रश्न झाला आहे.

त्याविषयी पुन्हा केंव्हा तरी...