"लेख माहितीपूर्ण आहे, पण "अहिंसेची महती गाणाऱ्यांपैकी कुणालाही शक्य असणे दूरच पण सुचलेही नाही .."

हे म्हणण्याचे काय प्रयोजन? अहिंसेची महती कळणाऱ्यांच्या मनात हिंसेने हेतू साध्य करायचा विचारच कसा येईल? त्यात काय चूक? तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या स्फोटाने हेतू साध्य  झाला. पण स्वातंत्र्य मिळाले नाही. शहिदांचे बलिदान हे वंदनियच आहे. पण हिंसक आंदोलने अल्पजिवी ठरतात तसेच झाले. हिंसेच्या मार्गाने मिळालेले स्वातंत्र्यही त्याच मार्गाने जाते याची कितीतरी उदाहरणे देता येतील.  कायद्याच्या चौकटीत राहून जनआंदोलन फक्त अहिंसक मार्गानीच यशस्वी होऊ शकते.