सर्वसाक्षी यांनी लिहिलेला लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनीय उतरला आहे यात शंका नाही. परंतु लेख वाचून असा समज होतो की, भगतसिंगादी वीरांना झालेली फाशीची शिक्षा ही ह्या "अहिंसक" बाँबस्फोटामुळे झाली असावी ! भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना झालेली फाशीची शिक्षा ही साँडर्स या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी झाली होती. हा उल्लेख असता तर लेख अधिक परिपूर्ण झाला असता असे वाटते.