नमस्कार लोकहो. प्रतिसादाखातर सगळ्यांना मन: पूर्वक धन्यवाद!

गोरेसाहेब अगदी खरे आहे आपले म्हणणे. आपल्या आजूबाजूची माणसे नित्यनियमाने करीत असलेली (क्षुल्लक का असेनात) कामे आपल्याला यायला हवीत. नसल्यास त्याला परावलंबित्व मानावे. ही प्रवृत्ती कर्त्या वयातच बाणविल्यास वार्धक्य पेलवणे सहज साधेल असे वाटते.

हॅम्लेट महोदय आत्मपरीक्षणाची गरज प्राकर्षाने जाणविल्यामुळेच मी हे लिहीले आहे. मात्र, आत्मपरीक्षणाचा आधार सद्यस्थितीची माहिती हा असायला हवा. त्याचाच सतत शोध घ्यायला हवा असे मला सांगायचे आहे.

लिखाळ महाशय आपलीही स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेली ह्याबाबतची मतेही आम्हाला अवश्य कळू द्या.

द्वारकानाथजी मला तुमचे नेहमीच कौतुक वाटते. तुम्ही कळीचा मुद्दा नेहमी वेगळ्याच नजरेने बघता. म्हणूनच तुम्हाला हे जाणवले असावे की आपल्या नित्यकर्तव्यांव्यतिरिक्त इतर अनेक कामेही आपण शिकून घेतली तर मावळतीच्या काळात अवश्य उपयोगी पडतील. मी आपल्याशी शतप्रतिशत सहमत आहे.

विनायकराव, अहो आपण आपल्याच कित्येक क्षमता केवळ वापर न केल्याने यथावकाश गमावत जातो. भारतातही आज भारतीय संडासात बसू न शकणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एवढेच काय पण रोज बैठ्या-उभ्या जीवनशैलीत आकंठ बुडालेल्या आमच्यासारख्या अनेकांना तासभर मांडी घालून बसणे जमेनासे होते. तर वज्रासन घालणे अनेकांना शक्य राहिलेले नसते. आपले पूर्वज ८०-९० वयापर्यंतही दूरवरच्या भारतीय संडासात पायी जाऊन व्यवस्थित बसत असलेले मी पाहिलेले आहेत. निस्संशयपणे आपण आपल्या दिनचर्येचा पुनर्विचार करायला हवा आहे. कर्त्या वयातच तो केल्यास सुधारणेला वाव राहून वार्धक्यास सामर्थ्यधार्जिणे करता येईल.