शनिमहाराज,

प्रयोजन सरळ आहे. ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला त्यांनी अहिंसेचा द्वेष वा कुचेष्टा कधीच केली नाही. मात्र या अहिंसक कृत्याबद्दल कुणाही अहिंसावाद्याने या देशभक्तांचे कौतुक वा पाठराखण केली नाही. अहिंसावाद्यांनी क्रांतीकारकांना केवळ द्वेषाच्या व हेटाळणीच्याच नजरेने पाहीले.

क्रांतीकारकांनी इथे सप्रमाण सिद्ध केले की स्वातंत्र्यप्राप्तिचा कोणताही मार्ग आम्हाला त्याज्य नाही, पण जो अधिक प्रभावी वाटला तो आम्ही स्विकारला आहे.

आपल्या इतर मतांशी मी सहमत नाही, मात्र त्यावर आपण स्वतंत्र चर्चा करुया, तो या लेखाचा विषय नाही.

धन्यवाद.