महाराष्ट्र राज्य झाल्यावर, महाराष्ट्र सरकारने एक लिपी-सुधार समिती नेमली. मला वाटते वसंत बापट तिचे अध्यक्ष होते (चु भु द्या घ्या). त्या समितीच्या अनेक शिफारशींपैकी एक होती - सर्व अनुच्चारीत अनुस्वार रद्द करणे. अपवाद जुने मराठी साहित्य.
ज्ञानेश्वरांच्या पसायदानात एक ओळ आहे - दुरितांचे तिमिर जाओ.....
हे जुने मराठी पद्य असल्यामुळे "दुरितांचे" ह्या शब्दावर अनुस्वार जरी असला, तरी तो अनुच्चारीत आहे. परंतु हे ठाऊक नसलेले अनेक लोक (आमच्या एका शिक्षकांसहित) त्याचा उच्चार अनुस्वारासहित करीत !
अर्थात ही anomaly ही मराठी भाषेचे वैशिष्ठ्य म्हणावे की न्यूनत्व, हा वादाचाच विषय आहे.