धन्यवाद सुनील,

असा काही समज होइल असे मला वाटत नाही, अर्थात प्रत्येकाचा समज वेगळा असू शकतो व व्यक्तिश: प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे व त्या बद्दल मला पूर्ण आदर आहे. हा लेख हुतात्मा भगतसिंग यांच्या ध्येयवादावर असल्याचे मी स्पष्ट केलेच आहे; शिवाय हुतात्मा लालाजींच्या मृत्युला हिंदुस्थानी रक्त व्यर्थ जाउ देणार नाही, तुम्ही जर निरपराध व नि: शस्त्र हिंदुस्थानीयांवर शस्त्र चालवाल तर तेच हिंदुस्थानी शस्त्र चालवीणारे हात समूळ उखडाल्याशिवाय राहणार नाहीत हे दाखवून देण्यासाठी हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू व हुतात्मा सुखदेव यांनी जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचा वध केला हे सर्वानाच माहीत आहे. शिवाय बॉंब स्फोटाचे वेळी हुतात्मा भगतसिंग यांचे समवेत क्रांतीवीर बटुकेश्वर दत्त होते (जे फासावर गेलेले नाहीत वा तसा उल्लेखही नाही) तेव्हा असा गैरसमज होणे स्वाभाविक वाटत नाही.

आपल्या सकारात्मक प्रतिसादा बद्दल धन्यवाद. आपल्या सूचना पुढील लेखनासाठी अवश्य लक्षात घेइन.