निनाद नमस्कार.
तुमची मराठीप्रतीची कळकळ प्रामाणिक वाटते.
पण त्याकरीता तुम्ही स्वत: शुद्ध मराठी बोलायला, लिहायला, वाचायला लागण्याची गरज अधिक आहे.
मराठी भाषकांनी इंग्रजी, हिंदी, गुजराती शब्दमिश्रित धेडगुजरी भाषेत कदापीही बोलू नये.
एकतर अस्खलित शुद्ध मराठीत बोलावे. किंवा ज्या भाषेत बोलायचे असेल ती शुद्ध बोलावी.
ह्यासाठी द्वारकानाथजी कलंत्री ह्यांनी मनोगतावरच राबवलेल्या शब्दसाधनेचा लाभ घ्यावा.
मनोगताच्या उत्कृष्ठ व्यासपीठाचा लाभ घ्यावा. शुद्धिचिकित्सक वापरावा.
आणि मराठीच्या जोपासनेत, संवर्धनात मोलाची भर घालावी.
आपण आपल्याकडून निरामय, निखळ, शुद्ध, प्रमाणित मराठी भाषेचा वापर करण्याचा,
आपण सर्वच मन:पूर्वक प्रयत्न करू या. तेवढेच पुरेसे ठरेल. किंबहुना पुरून उरेल.