मुंबई माझे नावडते गाव. (गैरसमज नको, पुणेही नावडतेच आहे!) पण मुंबईकरांबाबत मनात जबरदस्त कुतुहल आहे. लोकलमध्ये जुळलेली नाती वरवरची असतात असा माझा समज होता (अद्यापही आहे!). ते काही प्रमाणात तरी खरेच असावे असे या लेखावरून दिसते. 'आतले आणि बाहेरचे' लोकलदर्शन घडवणारा हा लेख आवडला.