विनायकराव,
मूळ कांद्यापोह्यापेक्षा त्यावर पेरलेले खोबरे कोथिंबीरच अधिक चविष्ट असावे, तसे तुमचे प्रतिसादच मूळ लेखांपेक्षा रंजक असतात. या माहिती नसलेल्या / विसरलेल्या गोष्टी आठवून दिल्याबद्दल आभार. 'एस. कुमार्स' तुम्हालाही आठवले, हे वाचून आनंद झाला. कितीतरी वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. त्याचा इतक्या वर्षांनंतर इथे असा उल्लेख थोडे स्मरणरंजन करून गेला.
इतर कवींविषयी लिहिण्यासाठी पोहे निवडतो आहे. नारळ खोवायला घ्या!