सर्वसाक्षीजी, तुमच्या सर्वच लेखनाप्रमाणे हेही चित्तवेधक झालेले आहे.
तुम्ही म्हणता की 'गाडीतली ओळख पक्की असते', यासंदर्भात मला एक हकीकत नमुद करायची आहे.
माझ्या एका शेजाऱ्यांच्या मुलीसाठी स्थळ शोधत होते.
ते ज्यांचे घरी पोहोचले, त्यांचेसोबत त्यांनी दहा वर्षांपूर्वी अनेकवर्षेंपर्यंत गाडीतून प्रवास केलेला होता.
मग आणखी चौकशी करण्याची गरजच पडली नाही. लग्न ठरले.