संजोपजी,

नकळत तुलना व्यक्त होते आहे खरी. मी नारळीभात हा शब्द वापरला तेंव्हा ते ध्यानात आलंच नाही. पण...

माझा प्रतिसाद लेखाच्या एकंदर दर्जाविषयी नव्हताच. भाषेची लज्जत वाटली नाही इतकेच. बाकी मला वाटते लेखकाच्या दोन लेखांची तुलना करणे योग्य नाही. लेख कोणत्या विषयांवर आहेत, त्या विषयांचा लेखकाचा अभ्यास किती आहे.. अशा बऱ्याच गोष्टींवर लेखाचा दर्जा ठरत असतो हे तुमचे म्हणणे शंभर टक्के मान्य. त्यामुळं माझी चूकही मान्य.

पुढच्या लेखांची प्रतीक्षा आहेच. आणि ते गाण्यांच्या रसग्रहणाचंही मनावर घ्यावं, ही विनंती.