तुमच्या ह्या लेखावरून वीस एकवीस वर्षांपूर्वीची आठवण झाली. मला तेव्हा ठाण्यातून निघून  चालत - ठाण्याची बस - लोकल - मुंबईची बस - चालत - असे करत अंधेरी एमायडीसीत जावे लागे. तेव्हा लोकल मध्ये शेजारच्या डब्यात झंचक झंचक अशा ठेक्यात भजने वगैरे गाणी चालत. (अडीच वर्षे अशी काढली!) तेव्हा जाता येता 'कुर्बानी कुर्बानी' ह्या गाण्याच्या चालीत मुंबईबाहेरचे घर ... हे गाणे मी जुळवले होते, त्याची आठवण झाली. येथे पाहावे. मुंबईबाहेरचे घर छान!

कुर्बानी कुर्बानी ह्या गाण्यातल्याप्रमाणे दोन मित्र एकमेकांशी बोलत आहेत अशी कल्पना आहे.