लेख छान आहे. पूर्वी मला अजिबातच मुंबई आवडायची नाही, दोन कारणांसाठी गर्दी व सतत येत असणारा घाम. लग्न झाल्यावर जेव्हा लोकलने प्रवास करायचे तेव्हा असे वाटायचे की आपण लोकलमध्ये कधीच चढू शकणार नाही. ईस्ट-वेस्ट, लोकलच्या वेळा घोषित केल्यानुसार माणसे पळत जाऊन कशी काय लोकल पकडतात याचे खूप आश्चर्य वाटायचे. पण हळू हळू सवय झाली. कचेरीच्या वेळेस काही कामानिमित्त डोंबिवलीतून अतिजलद १२ डब्याची लोकलने प्रवास केला, त्यात महिलावर्गाच्या डब्यामधे चांगला अनुभव आला. म्हणजे ज्याप्रमाणे लोकांना स्टेशनवर उतरायचे असते त्याप्रमाणे एकापाठोपाठ महिला उभ्या असतात. तिथला कारभार अगदी व्यवस्थित वळणामधे चालतो.
काही दिवस ठाण्याला CS च्या क्लासकरता जात होते, अर्थात जाता येताना अजिबात गर्दी नसायची. संध्याकाळी ६ ला डोंबिवलीतून निघून ठाण्यातून येताना रात्रीचे ९. एकदा क्लास झाला नाही त्यामुळे संध्याकाळी ६ ला ठाण्यावर आलो मी व माझी मैत्रिण. ती गर्दी बघून मला तर धडधडायलाच लागले. २-३ लोकल अश्याच सोडून दिल्या. माझी मैत्रिण म्हणाली की तुम्हाला सवय नाहीये. आपण जर अशाच लोकल सोडून दिल्या तर आपण कधीच चढू शकणार नाही. तिला खूप सवय होती लोकलची. मग मी परत ठाण्याला माझ्या मामेबहीणीकडे गेले, व गर्दी ओसरल्यावर परत ९ ची लोकल पकडून घरी आले. तिला सांगितले की क्लास झाला नाही म्हणून तुला भेटायला आली आहे.
असे ऐकले आहे की महिला वर्गाच्या डब्यामध्ये वाढदिवस, हळदीकुंकू व डोहाळेजेवण वगेरे करतात. हे खरे आहे का?
विनायकने मात्र डोंबिवली ते अंधेरी असे १० वर्षे अप-डाऊन केले. सकाळी ७.२७ ची १२ डबा अतिजलद लोकलने घाटकोपर. तिथून ३ जण मिळून शेअर तीनचाकी करायचे अंधेरी पर्यंत. तो तीनचाकी वाहनचालक पण ठरलेला होता. त्यामुळे जाताना तरी बऱ्यापैकी सुखकर प्रवास होत होता. येताना मात्र खूप हाल व्हायचे. घरी फक्त जेवायला आणि झोपायला. शनिवारी अर्धा दिवस म्हणजे तसाही तो दिवसही प्रवासात जायचाच.
एक मात्र आहे की मुंबईत रात्री १२ ला जरी प्रवास केला तरी गर्दी असल्यामुळे सुरक्षित वाटते.