नरेंद्र राव,
विषय चांगला आहे !
पूर्वी गावभर उनाडक्या करताना शेजारच्या काकूंनी सांगीतलेले दळण आणण्याचे कामही केले असल्याचे प्रकर्षाने आठवले. हल्ली दळण आणणे सोडा, सौ. ने खाली जाऊन मिरच्या आणायला सांगीतल्या तरी कपाळावर आठ्या चढतात.
कलकत्त्याला मी एकटा राही, लग्नापूर्वीही मी एकटाच मीरा रोडला राहात होतो त्यावेळी कपडे धुण्याचा व घर साफ सफाईचा नित्य कार्यक्रम ठरलेला असे. मीरा रोडला असताना बाहेर जेवण्याचा कंटाळा येतो म्हणून बऱ्याचदा स्वयंपाकही (तोही स्टोव्ह वर ) केलेला होता.
हल्ली मधूनच डोक सरकल की एखादी भाजी वगैरे करतो पण बायको "नको" म्हणते....
"तयारी करून दिल्यावर फोडणी टाकायचे काम म्हणे मी पण करू शकेन !" काय अरसीक आहे ना ?
पण माझ्यामते ही सर्व चक्रे असतात व फिरून खाली गेलेला बिंदू कधीना कधी परत वर येतो.
काही सेवानिवृत्त मंडळी हातपाय सुरू रहावेत किंवा आवश्यकतः पडली म्हणून हीच कामे स्वतःहून करतात हे ही मी बघीतलेले आहे.