माधवराव,

हा लेख वाचून खूप बरे वाटले. अलिकडे गणेशोत्सव म्हणजे वर्गणी व गोंगाट अशी नको ती ओळख पसरत असतान आपण हे चांगले रूप दाखवलेत. लहानपणी आपल्या भागातल्या गणपती उत्सवात कार्यक्रमाला जाणे व एखाद्या तरी कर्यक्रमात भाग घेणे हे ठरलेले. शिवाय बाप्पाना आणायच्या मिरवणूकीत आपल्या मंडळाचा आडवा कापडी फलक धरायला मिळावा यासाठी चढाओढ असायची. त्या आठवणी आज जाग्या झाल्या.

अशा कार्यक्रमातूनच कलागुणांना वाव मिळायचा हे अगदी खरे.