विलासराव,

श्री. अत्त्यानंद यांचे लेखन हे मौजमजा, विरंगुळा या सदरात आहे हे आपण सांगीतलेच आहेत. मला असे वाटते की त्यांचा केवळ गंमत तसेच जे भोंदू लोक बाबागीरी करून जनतेला फसवतात त्यांचे बिंग फोडणे असा हेतू असावा. कदाचित नावांच्या ओघात काही सन्मार्गी सत्प्रवृत्त पुरूषांचीही नावे आली असावीत. अर्थात लेखन करताना भान ठेवणे आवश्यक आहे यात शंकाच नाही, पण तरीही श्री. अत्त्यानंद यांचा कुणाची बदनामी करण्याचा वा कुणाला दुखावण्याचा हेतू नक्कीच नसावा.

आपण काही सत्पुरूषांना जवळून पाहिले असल्याने व त्यांचे शिष्यत्व स्विकारले असल्याने आपण त्या गुरूंवरील बदनामीकारक लेखनाने अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे पण तरीही हे लेखन त्या हेतूने नसावे असा माझा तर्क; म्हणजे मी ज्या अत्त्यानंदांना ओळखतो ते असे सवंग लेखन नक्कीच करणार नाहीत.

मात्र एकूण ज्या संयमाने आपण हे लेखन केले आहेत त्यावरून आपले संतुलीत व्यक्तिमत्त्व जाणवल्या खेरीज राहत नाही.