आता मला असे वाटते की सध्या या प्रकाराचा अतिरेक होतो आहे.
विनायक यांच्या मताशी सहमत आहे.
मनोगतावरील शब्दसाधनेसंदर्भात मला वाटणारे काही महत्वाचे मुद्दे -
१) मनोगतावर घेतले जाणारे शब्दसाधनेचे धडे हा मला केवळ एक फार्स वाटतो.
२) मनोगतावरील शब्दसाधनेसारख्या प्रकल्पातून एक तर केवळ एकांगी, किंवा मराठी भाषेविषयी केवळ झापड लावलेले विचार जन्माला येतील असे वाटते. ज्याला माझ्यामते काहीही अर्थ नसेल!
३) मनोगतावरील शब्दसाधना प्रकल्प हा केवळ एक खेळ किंवा एक स्वाध्याय, किंवा दहा-वीस मार्कांची घेतली जाणारी शाळेतली चाचणी परीक्षा म्हणूनच ठीक आहे.
मराठी भाषेचा वापर, आणि त्याबदलचा आग्रह परंतु त्याचबरोबर तिचे आजच्या व्यावहारिक जगातील स्थान याचा सारासार विचार आणि भान(!), या सर्व गोष्टी विनायकांनी उल्लेख केलेल्या लीना मेहेंदळे यांच्या लेखात मला दिसल्या. माझ्या मते हा लेख नक्कीच वाचनीय आहे!
एकंदरीतच लीना मेहेंदळे यांचे विचार मला खूपच प्रगल्भ परंतु तेवढेच सोयीचे, सुटसुटीत आणि विनाफार्स वाटले.
द्वारकानाथांनी दिलेले काही ऐतिहासिक दाखले वा उदाहरणे मला सद्य परिस्थितीशी संबंधित न वाटता पूर्णत: अप्रस्तुत वाटली.
कळावे,
माधवी गाडगीळ.