प्रतिसादानिमित्ताने गुलजार या विषयावर चर्चा झाली, हे बरे झाले. गुलजारच्या गाण्याचे रसग्रहण करावे असा एक विषय मांडला गेला  आहे. अशा गाण्यांचा किंवा कवितांचा भावानुवाद करता आला तरी रसग्रहण करता येणे (मला तरी )शक्य वाटत नाहीत. 'एक अकेली छत्रीमें जब आधे आधे भीग गये थे.... गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो... वो भिजवा दो' यावर काही लिहिता येईल असे मला वाटत नाही. किंबहुना काही लिहिलेच तर ते अगदी केविलवाणे आणि ठिगळे जोडल्यासारखे होईल असेही वाटते. 

'तू आली आहेस गं, प्रकाश पडला आहे गं 
नाहीतर दिव्यातून उजेड चालला होता
तुझ्यामुळं जगायला कारण मिळाले आहे रे
अगदी निष्कारण जीवन चालले होते'

असे काही लिहिण्यापेक्षा न लिहिलेले बरे, नाही का?
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.