अशा विषयाकडे विरंगुळा / मौजमजा ह्या दृष्टीने पाहिले जाऊ नये या मताचा मी आहे.

शक्य आहे, आपले असे मत असू शकते त्याप्रमाणेच इतरांनाही आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. एखादा मनुष्य याप्रकाराकडे मूर्खपणा म्हणून पाहात असण्याची शक्यताही आहे किंवा विरंगुळा/ मौजमजा म्हणूनही, त्याने तसे करू नये असे सांगणे म्हणजे आपली मते त्याच्यावर लादणे नाही का?  आपल्याला आलेल्या प्रचीतीच्या अगदी उलट प्रचीतीही एखाद्याला येऊ शकते, त्याचे नुकसानही झालेले असू शकते यामुळे तो अशाप्रकारांकडे संशयानेही पाहू शकतो. आपल्याला जे पटले ते इतरांना पटेलच असे तर नाही आणि त्यांनी त्याबाबत नकारात्मक सूर काढला तर तो का स्वीकारण्याची तयारी असावी.

मलाही रावसाहेबांच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे गाडगे महाराजांचीच यावेळी आठवण झाली. मी स्वतः बाबा, बापू, बुवा मानत नसल्याने त्यांच्याबद्दल फार माहिती गोळा केली आहे असे म्हणणार नाही परंतु प्रत्यक्ष डोळ्यांनी प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची फुलांच्या सेजावर विराजमान झालेली प्रकाशचित्रे पाहून मनात शंका नक्कीच उत्पन्न झाली होती आणि हातात झाडू घेऊन फिरणाऱ्या गाडगे महाराजांचीच आठवण झाली होती. त्यांच्या एका परमभक्ताला याबाबत विचारणा केली असता भक्तांच्या प्रेमाखातर हे सर्व करावे लागते असे उत्तर मिळाले. यावेळेसही पाया पडायला येणाऱ्या माणसांना झाडूचा प्रसाद देणाऱ्या गाडगेमहाराजांची आठवण झाली होती.