भारतातले हे एजंट पैसा कमावण्यासाठी कुठल्याही थरावर जातील असेच आहेत. अरुणराव बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट सांगत आहेत म्हणजेच त्या काळातली परिस्थिती सद्य परिस्थितीपेक्षाही बिकट असावी- त्यातच कनिष्ठ स्तरांवर काम करणाऱ्या मजूर वर्गाला आपण कुठल्या "डिक्लेरेशन्स" च्या खाली सह्या करतोय ह्याची योग्य जाण नसायची (आजही नाही !)
तो गृहस्थ मराठी होता म्हणून त्याने कबुल तरी केले की त्याला ह्या कामाचा पूर्वानुभव नाही. सोपवलेल्या कामा बद्दल काहीही न जाणणारी बरीच मंडळी बघण्यात आलेली आहेत.  
अरुणरावांच्या ह्या भागाने प्रतीक्षा तर संपली - आम्हा वाचकांच्या फायद्यासाठी त्यांना लवकर प्रकृतीस्वास्थ लाभो ही सदिच्छा ;)