वरील सर्व लेखन व प्रतिसाद वाचून एक जाणवले, की आजही काही मंडळी वस्तुंना जास्त प्राधान्य देत असतात. मी स्वतः बुवाबाजी ला थारा देत नाही. पण म्हणून हजारोंच्या संख्येने पोपच्या समोर बसून त्याचे भाषण/विचार ऐकणारे सर्वच बथ्थड डोक्याचे असावेत का हा ही विचार मनांत येतो. प्रत्येक चर्चच्या मागे वस्तु विकण्याचे एक भांडार - मंदिरा समोर फुल/नारळ विकणारा पोऱ्या हे कशाचे प्रतिक मानावे ?
फक्त येशुचा क्रॉस विकत घेवून व काही मेणबत्या त्याच्या समोर पेटवून किंवा देवासमोर नारळ फोडून इप्सित साध्य होत असेल असे नाही वाटत. मतितार्थ- क्रॉस/पादुका विकत घेउन त्यांची पुजा करण्याऐवजी प्रवचनांकडील विचारांवर लक्ष दिल्यास आचार नाही तर कमीत कमी विचार घडवण्यास मदत होईल असे वाटते.
भल्या मोठ्या पोप ला असे वाटले नसते तर त्याने मुर्खासारखे इतक्या लाखोंच्या गर्दी समोर विचार प्रवर्तन का केले असते?