माधवराव, खरोखरीच गणेशोत्सव आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक अमोल वारसा आहे.

पाटावर गणपती ठेवून, तो पाट डोक्यावरून काळजीपूर्वक घरी घेऊन जाणारा मुंबईकर पाहिला
की वाटते एवढा मान तो क्वचितच कुणाला उभ्या आयुष्यात देत असेल!

तुम्ही काय काय करावे ह्याचे आणि संजोपरावांनी काय काय करू नये ह्याचे
उत्तम दिग्दर्शन केल्यामुळे हा लेख सर्वांग परिपूर्ण झालेला आहे.

समारंभ-नियोजनाचे धडे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अगदी प्रात्यक्षिकांसहित आपण गणेशोत्सवात
अक्षरश: मोफत मिळवू शकतो. तेही ऐच्छिक रीतीने.

जुन्या आठवणींना उजाळा दिल्याखातर मन: पूर्वक धन्यवाद.