हा लेख जरा उशीरानेच वाचला. नर्मदा - सरदार सरोवर हा विषय तसा अपरिचित नाही पण परिचितही नाही. इथे शहरात बसून सगळ्या सुखसोयींच्या भोवऱ्यात धरणग्रस्तांच्या दुःखाबद्दल खोटा कळवळा दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांच्यात जाऊन त्यांच्याशी बोलावं असं खूप वाटलं. स्वतःच्या कोडगेपणाची आणि पळपुटेपणाची लाज वाटली. पण मुर्दाड मन तिथे जायला घाबरतं.
तुमचा लेख वाचताना अंगावर शहारे आले. भीती वाटली. धरणाने नक्की लाभ कोणाचा होणार माहीत नाही पण पाण्याखाली गेलेला प्रदेश, प्राणीजीवन, वनस्पती आता परत कधीच बघायला मिळणार नाहीत याबद्दल खूप हळहळ वाटली.
चीनमधल्या नदीची पाण्याखाली जाणारी गॉर्जेस, गंगेत मिसळणारा भागीरथीचा प्रवाह कायमचा बंद होणं वगरे गोष्टी आठवल्या. नकळत नर्मदे हर या पुस्तकाचीही आठवण झाली.
लेख सुंदर म्हणताना मन चरकलं इतका परिणामकारक झाला आहे...
--अदिती