उर्दूमध्ये
"देव" म्हणजे राक्षस आणि
"मोर" म्हणजे मुंगी
फार पूर्वी मी शब्दांच्या अर्थ-अनर्थांविषयी मनोगतावर "हे शब्द (असे) कसे आले" हा लेख लिहिला होता त्यात आणखीही उदाहरणे आहेत.
आणखी एक काहीसे अशिष्ट उदाहरण. फ़्रेंचमध्ये gou^t या शब्दाचा अर्थ चव असा होतो. आमचे शिक्षक ही गोष्ट आम्हाला शिकवताना "dont le gout est delicieux" (कशाची तरी चव - डेलिशिअस - छान आहे) असे काहीतरी वाक्य सांगत होते. पण त्याचा उच्चार "ल गू ए देलिसिअ" होता. याची मजा वाटून आम्ही मराठी विद्यार्थी कुजबूज करू लागलो, यावर त्यांचा समज झाला हे लोक उगीच दंगा करताहेत आणि ते अधिकच मोठ्ठा आवाज काढून तेच वाक्य पुन्हापुन्हा म्हणू लागले. तेव्हा हहपुवा झाली ती अजूनही आठवते.
फ़्रेंचमध्ये मराठी लोकांना याहून अधिक अशिष्ट वाटतील असे शब्द आहेत पण त्यांचा उल्लेख येथे न केलेला बरा.