सर्व सूज्ञ आणि जाणकार मंडळी अशी हमरीतुमरीवर आली तर आम्ही अज्ञ पामरांनी कुणाच्या तोंडाकडे पहायचे?

इतकी जाणकार मंडळी मनोगतवर आहेत, आणि परस्परांच्या मतांचा आदर करुन संयमाने लेखन करतात आणि आम्हाला त्याचा लाभ घेता येतो.

यापरता आनंद नाही! सर्वांचे मन: पूर्वक अभिनंदन!

खरेतर विषय अगदी साधा  आहे. हा ज्याच्या त्याच्या समजूतीचा भाग आहे. वरती प्रा. अत्यानंदानी  म्हंटल्याप्रमाणे योग्य - अयोग्य ठरवणारे आपण कोण? आपआपल्या आकलनाप्रमाणे आपण योग्य-अयोग्य निष्कर्ष काढून अटीतटीला येतो. वास्तविक तेच "अंतिम सत्य" आहे का?

एका गांवात एक लंगडा घोडा एका शेतकऱ्याने पाळला होता. 

गांवकरी  म्हणायचे, कशाला लंगडा घोडा पाळलाय.... खायला कहार , भुईला भार! 

बिचारा शेतकरी ऐकून घ्यायचा!

त्यावर्षी एका असाध्य रोगाने गावातील सर्व बैल मेले. साहजिकच गावातल्या सगळ्या पेरण्या या लंगड्या घोड्यांने केल्या.

ग़ावकरी खूष! म्हणाले बरं झाले रावसाहेबांनी घोडा पाळलाय!

काही दिवसानी शेतकऱ्याचा  जवान पोरगा या लंगडया घोड्यावरून रपेट मारताना पडला! पोराचा पाय मोडला...पोरगा अंथरूणावर....!

गांवकरी  म्हणायचे, कशाला लंगडा घोडा पाळलाय.... मोडला की नाय पाय जवान पोराचा?

दैववशात राज्यांवर परचक्र आले, गावातली सगळी जवान पोरं लढाईला धरून नेली....‌शिवाय रांवसाहेबाचा पोर!

ग़ावकरी म्हणाले बरं झाले रावसाहेबांनी घोडा पाळलाय! पोराचा जीव वाचला.....!

तेव्हा मंडळी, आमचे म्हणणे एवढेच की... देअर ईज नो अब्स्लूट राईट ऑर राँग! सारे काही सापेक्श आहे..!

बाकी हिशेब मांडायला चित्रगुप्त समर्थ आहे....( त्याने हल्ली पेंटीयम ४ घेतला आहे म्हणे....तेव्हा सावधान... !) तो बघून घेईल बुवाबाजी करणारांकडे! आपण आपले पाहून घ्यावे... या महंतांच्या मागे लागणारे सारेच अडाणी आहेत का हो? किबहुना सारे जाणकरच तर गैरव्यवहारात आहेत.

आपण चांगले पहावे..... लोकोत्तर काम करताना काही वाईट -उणे होत असेलही.. आपणतरी परिपूर्ण आहोत का? एखादा मूर्ख म्हणेल "शिवाजी महाराज असतील युगपुरुष ...पण त्यांनी तर आठ- आठ लग़्नं केली?..... याला दृष्टीदोष म्हणून सोडूनच द्यावे लागेल.....!

आपण आपला भाव पहावा आणि श्रद्धास्थाने ठरवावीत. हे  लॉजिकल नाही ..थोडेसे सायकॉलॉजिकल आहे. तर्काच्या कसोटीवर सांगण्यासारखे नाही.

आणि राहता राहीला परमेर्श्वराचा प्रश्न... त्याला काहीही चालते... पत्रं पूष्पं फलं तोयं.... तेथेही पुन्हा फक्त भाव महत्त्वाचा....!

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतसे भगवंत !

ह̱. घ्या. कुणालाही दुखावण्याचा हेतु नाही आणि खंडण-मंडण करण्याइतका आमचा अभ्यास ही नाही!

-विटेकर.