प्रभाकर पेठकर,
आपले म्हणणे पटले. शुद्धतेची कास धरलीच पाहिजे.
माझेही लिखाण १००% शुद्ध नसते. माझे प्रस्तूत लिखाणही त्याला अपवाद नसावा. याला शुद्धलेखनाबद्दलचे अज्ञान, आणि ते दूर करण्यातील आळस या दोन गोष्टी कारणीभूत आहेत.
लवकरच मायभूमीत परतत आहे, त्यानंतर घरच्याघरी माझे लिखाण तपासून बघता येईल.
खरे तर मनोगतवर शुद्धलेखनाचे पुस्तक उपलब्ध आहे, परंतु प्रत्येक कान्हेमात्रेच्या वेळी त्याचे सहाय्य घेणे अवघड होते.
इच्छा असेल तर अर्थातच मार्ग निघतो. लोकांच्या मनात तीच निर्माण होणे गरजेचे आहे.
अमित चितळे