अत्त्यानंदजी,
आपले शिर्षक आवडले.
आपण जे काही लिहिले आहेत ते अनुभव आहेत कींवा ऐकीव ज्ञान आहे?
मी या बाबतीत पार अनभिज्ञ आहे. आजपर्यंत कुठल्याही महाराज, स्वामी वगरेंच्या जवळ जायचा योग आला नाही, त्यांची प्रवचनेही ऐकली नाहीत; शिष्यत्व वगरे फारच लांब. तसा मी या लोकांपासून चार हात लांब. आपला देव बरा. देवळात वा तसबिरीत राहतो, तुम्ही द्याल ते आनंदाने स्विकारतो. तुम्ही त्याच काहीही न करता संकटात त्याला हाक मारू शकता, तो ओ देत नसला तरी 'आता का माझी आठव्ण झाली असे तरी विचारत नाही'. शिवाय दगडाचा देव म्हणजे उत्तम सोय! त्याला आपल्या मनात सलणारे दु:ख सांगीतलेत वा अपराध सांगीतलात तरी ते क्य्णाला जाउन सांगणार नाही. वर तुमचे मन मोकळॅ होते ते वेगळे.
पण माझे एक निरिक्षण आहे. ९९% लोक हे चुलत विरोधक असतात किंवा चुलत भावीक असतात. चुलत विरोधक /भक्त म्हणजे अमका म्हणत होता वा तमक्या वाहीनीवर दाखवले त्याअर्थी हे ढोंगच / अगदी बरोबर आहे असे म्हणणारे.
आमच्या ठाण्यात एक खूप मोठे गृहस्थ राहायचे. त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली व अखेरपर्यंत ते स्वतः भोग-विलासापासून दूर राहीले. या गृहस्थांनी पत्नी जीवंत असताना दुसरे लग्न केले आहे अशा वावड्या उडाल्या होत्या. हे बरोबर आहे, सत्य आहे असे छातीठोक पणे सांगणारे अनेक वाचाळ वीर भेटले. पण तुम्ही त्यांच्या दुसऱ्या पत्नीला व त्यांना कधी एकत्र पाहीले आहेत का? त्यांचे लग्न झाल्याचा काही ठाम पुरावा आहे का? असे विचारताच प्रत्येक जण सांगायचा की अहो पुरावा कशाला? माझ्या काकूच्याशेजारच्या बाई त्या दुसरीला लहानपणापासून ओळखतात / माझ्या मित्राच्या मामेभावाने त्यांना अनेकदा पाहीले आहे असे उत्तर मिळायचे. हो! मी त्यांना स्वतः पाहीले आहे, त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नांव अमुक एक आहे व ती अमुक एक ठिकाणी राहते, चला तुम्हाला दाखवतो असे ठणकावणारा एकही महाभाग भेटला नाही.
आपल्या लेखात ज्या महाराज लोकांचा उल्लेख आहे त्यांच्याकडून आपली फसवणूक कशी झाली वा या भोंदूने आम्हाला अमुक एक प्रकारे नादी लावले असा काही प्रत्यक्ष अनुभव आला आहे का? किंवा असा अनुभव स्वतः घेणारी कुणी व्यक्ति आपल्याला भेटली आहे का?
महाराज/ बाबा -श्रद्धा/ अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सरसकट सगळेच वाईट असे म्हणणे बरोबर नाही. रामदेव बाबा औषधात हाडे घालतात असा दावा करात बाइंनी केला होता पण त्या प्रत्यक्ष चाचणीत साफ खोट्या पडल्या.
एखाद्याचे बिंग फोडून, त्याचा बुरखा फाडून खरे रूप समाजापुढे आणून समाजाला त्यापुढील हानू पासून वाचवीणे हे निश्चितच असामान्य व कौतुकास्पद आहे. पण उगाच काठावर बसून सोयीस्कर निष्कर्ष काढणे कितपत योग्य आहे?